सायबर मध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद श्रीलंका मॉरिशस मधील विद्यापीठ सहभागी होणार..

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 48 Second

media control news network

कोल्हापूर दि.13, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर कोल्हापूर तर्फे येत्या पंधरा व 16 मार्च रोजी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरीशस यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. बदलते जग या संकल्पनेवर आधारित उद्योग शाश्वतता माहिती तंत्रज्ञान आणि मानवता या चार शाखांमधून 80 च्या वरती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शोधनिबंध आले आहेत या परिषदे करता श्रीलंका व मॉरिशस येथून प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी प्राध्यापक कोल्हापूर येथे आले आहेत.

याशिवाय ऑनलाइन पद्धतीने इतर संशोधनासह संशोधक विद्वान यात सामील होत आहेत. पहिल्या भागात ऑनलाईन पद्धतीने विविध बीज भाषणांचे व प्रबंध मांडणी तसेच भोजनोत्तर प्रत्यक्ष हजर संशोधक प्राध्यापक विद्यार्थी यांचे शोध निबंध वाचले जातील. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत सायबरने एकूण बारा देशांबरोबर गेल्या दोन वर्षात शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत यामध्ये अमेरिका म्यानमार सोरेन फिजि मॉरिशस श्रीलंका सोमाली लँड कंबोडिया नेपाळ कुर्ता स्थान लावोस इत्यादी देशांचा समावेश आहे.

पत्रकार परिषदेला श्रीलंकेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर के अर्जुन डॉ. के. लाईनाथन तसेच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी चे मॉरिशस येथून आलेले डॉ. सुलक्षणा भिवाजी डॉक्टर अमिताबाय आणि लक्ष्मण राम आणि विराज फुलेना उपस्थित होते. या परिषदेबरोबरच हे प्राध्यापक सायबर च्या विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमानुसार वेळ विषयांवर प्रत्यक्ष वर्गात जाऊन तास ही घेत आहेत हे या मधील वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे असे प्राध्यापक डॉ रथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *