काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च

क्राईम रिपोर्टर, जावेद देवडी

कोल्हापूर दि.13, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील लोकसभा निवडणूक 2024 चे पार्श्वभूमीवर रूट मार्च

एरिया डॉमिनेशन अनुषंगाने बीएसएफ कडील 3 अधिकारी व 40 जवान, शाहूपुरी पोलीस ठाणे कडील 6 अधिकारी ,45 अंमलदार व 32 होमगार्ड , 2 बस, 1 फर्स्ट मोबाईल असे लाईन बाजार चौक येथून सुरुवात करून पुढे भगवा चौक कसबा बावडा मेन रोड पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जय भवानी गल्ली झेंडा चौक कागलवाडी भगवा चौक व लाईन बाजार. अशा महत्वाच्या प्रमुख मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला.

Advertisements


तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सामाजिक, राजकीय, गुन्हे , संवेदनशील ठिकाण,कायदा व सुव्यवस्था ची माहिती सर्व उपस्थित जवान व अंमलदार यांना देण्यात आली. काही दिवसातच लोकसभा निवडणूक धांदल सुरू होणार याची अनुभूती भागातील नागरिकांना आला हे मात्र खर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *