माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांची घाटगे हाऊस नागाळा पार्कला सदिच्छा भेट

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 5 Second

विशेष वृत :शैलेश तोडकर

श्रीमंत शाहू छत्रपती हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत फक्त शिव, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांचा विचार जपण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने आज
घाटगे कुटुंबातील (वंदुरकर सरकार) यांच्या कुटुंबीयांनी घाटगे हाऊस नाकाळा पार्क येथे माजी आमदार मालोजी राजे यांची भेटीचे नियोजन केले होते.


याप्रसंगी घाटगे कुटुंबातील महिलांनी मालोजीराजेे यांची औक्षण करत स्वागत केले,

मालोजीराजे यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आशिर्वाद घेतले या प्रसंगी मालोजीराजे बोलताना छत्रपती शाहू महाराज लोकसभेच्या निवडणूकीसाठी उभे असून “साधी राहणीमान उच्च विचार” असलेल्या आपल्या महाराजांना आपण सर्वजण राजर्षी शाहू महाराज यांचे पूरोग्रामी विचार टिकवण्यासाठी दिल्लीच्या तक्त्यावर संसद भवन मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन पाठवू या.

7 मे रोजी मतदान असले तरी आत्ता पासूनच आपण स्वतःच उमेदवार असल्या प्रमाणे उपस्थीत सर्व जन कार्य जोमाने करावे असे सुचना करत घाटगे कुटुंबीयाने मेळावेचे नियोजन केल्याबद्दल धन्यवाद मानत आभार व्यक्त केले.

तसेच डी वाय पाटील विद्यापीठ यांनी कोल्हापूरच्या क्रिकेट विश्वातील बाळ पाटणकर यांना डिलीट पदवी देण्यात आल्याबद्दल मालोजीराजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी धैर्यशील घाटगे, संजयसिह घाटगे राजेश घाटगे, संग्रामसिंह खर्डेकर, भवानीसिंग घोरपडे, शिवराजसिंह गायकवाड, बिपिन साळुंखे, शैलेश तोडकर, चिंटू शिकलगार, शरद माळी, कुणाल मेस्त्री. ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरातील नागरिक व घाटगे कुटुंबियांचे संबंधित नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


उपस्थित मान्यवरांनी कोणत्याही परिस्थितीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याच वचन दिलं.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *