युवा पत्रकार संघ, कोल्हापूरच्या वतीने
जिल्हातील शहरी व ग्रामीण, श्रमिक मानधनावर काम करणारे मध्यमवर्गीय पत्रकार बंधू / भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रसार माध्यम मध्ये काळाच्या ओघात अनेक बदल घडत गेले अनेक विकसित तंत्रज्ञानामुळे माध्यम मध्ये झपाटयाने सुधारणा झाली पण सामाजिक जाणीव जपत लेखनीच्या आदारे न्याय मिळवून देणारे पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणारे कष्टकरी पत्रकारांच्या परस्थितीत मात्र सुधारणा झाली नाही.
आजही पत्रकारांचे अनेक कुटुंब भाडे तत्त्वावर, किंवा नातेवाईक यांच्या सोबत बेघर अवस्थेत राहत असलेले चित्र आहे.
अशा पत्रकारांच्याकडे शासनाने व संघटनेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे,
याची दखल घेउन युवा पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बंधू भगिनी व त्यांच्या कुटुंबियांचे माहिती उपलब्ध करून घेऊन शासन स्तरावर पत्रकार हक्काचे घरकुल मिळवण्यासाठी सर्वोतोपरी नियोजन करत आहे.
कोल्हापूर युवा पत्रकार संघातर्फे पत्रकांच्या हिताचे अनेक मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयापासून ते दिल्ली संसद भवन पर्यंत मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी शासनाकडे अनेक वर्षापासून कागदोपत्री पाठपुरावा करत आहे. यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांच्या घरासाठी राज्यातील पत्रकारांच्या अनेक संघटनांच्या कडून मागणी आहे. यावर शासनही सकारात्मक विचाराधीन आहे.
मात्र या मागणीमध्ये, अल्प उत्पन्न, कष्टकरी, श्रमिक, उपेक्षित,वंचित असलेल्या पत्रकार बंधु/भगिनींना वगळण्यात येणार असल्याचे चर्चा सुरू आहे,
निकषाच्या अटीवर अनेक पत्रकारांना यादीतून वगळणार असा अंदाज आहे. त्यामुळे
खऱ्या गरजु कष्टकरी लाभार्थ्यांना मुग गिळून बुक्क्यांचा मार सण करावा लागणार आहे. युवा पत्रकार संघ कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी राज्य शासन 50% व केंद्र शासन 50% अशा 100% शंभर टक्के अनुदान तत्वावर मोफत घर मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे,
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गेल्या अनेक दिवसा पासून सर्व समावेशक प्रसार माध्यम पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे कि- त्यांनी विनामुल्य नाव नोंदणी करावे.