रंकाळा परिसरामध्ये घडलेल्या निघृण खुनाचे गुन्हयातील आरोपींना पोलीसांनी केले जेरबंद..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 33 Second

कोल्हापूर प्रतिनिधी: अजित साळुंखे

येथील रंकाळा टॉवर, दिनांक ०४/०४/२०२४ रोजी सांयकाळी ०५.३० वा. अजय उर्फ रावण दगडु शिंदे वय २५, रा.डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर याचा दोन गटाचे वर्चस्व वादातुन ७ ते ८ आरोपीनी भर रहदारीचे ठिकाणी दहशत माजवुन धारदार हत्याराने त्याचेवर वार करुन, निघृण खुन केला होता .
सदरचा गुन्हा करुन आरोपी हे तेथून पळून गेले होते. पोलिसांना मारेकरांना पकडण्याचे एक आव्हान होते,
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर त्याचप्रमाणे जुना राजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना तात्काळ आरोपींची शोध घेवुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
सदरचा प्रकार हा आरोपी व मयत राहणेस असले परिसरामध्ये दोन गटाचे वर्चस्व वादातुन घडल्याने समजुन आले. आरोपी यांची माहिती घेतली असता खुन त्यांचेच परिसरातील राहणारे आरोपी १) राज जगताप २) आकाश माळी ३) सचिन माळी ४) रोहित शिंदे ५) निलेश माळी ६) गणेश माळी ७) प्रशांत शिंदे ८) निलेश बाबर यांनीच केलेचे निष्पन्न झाले.
सदरचे आरोपी यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथकातील पोलीस अंमलदार अमर आडूळकर व प्रविण पाटील यांनी वेळीच व अचुक माहिती घेवुन त्यातील ७ आरोपींना इस्पुलीं, ता. करवीर येथुन व निलेश बाबर यास सायबर चौक या ठिकाणाहुन ताब्यात घेतले.


आरोपी नावे १) राज संजय जगताप वय २१ रा. डवरी वसाहत साबर चौक कोल्हापूर,
२) आकाश आनंदा माळी वय २१ रा. मुळ गावा नांदणी नाका जयसिंगपूर सध्या रा. बालींगा ता करवीर,
३) सचिन दिलीप माळी वय १८ रा डवरी वसाहत यादव नगर कोल्हापूर,
४) रोहित अर्जुन शिंदे वय २० रा. डवरी वसाहत यादव नगर कोल्हापूर,
५) निलेश उत्तम माळी वय २१ रा. डवरी वसाहत कोल्हापूर,
६) गणेश सागर माळी वय १८ रा. डवरी वसाहत यादवनगर कोल्हापूर,
७) प्रशांत संभाजी शिंदे रा विड शेड ता. करवीर
८) निलेश बाबर रा डवरी गल्ली सायबर चौक कोल्हापूर
अशी असलेचे सांगून त्यांचेत व मयत अजय शिंदे याचेत यापुर्वी झालेला वाद मिटवणेचा आहे असे मयत यास सांगून त्यांनी अजय शिंदे याला रंकाळा टॉवर या ठिकाणी बोलावुन घेवुन सोबत
आणलेल्या हत्याराने अजय शिंदे याचेवर सपासप वार करुन त्याचा खुन केला असलेची कबूली दिली. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मा. अपर पोलीस अधीक्षक, जयश्री देसाई, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जुना राजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक शेप मोरे, संदिप जाधव यांचे पथकाने केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *