Kolhapur: लिफ्ट मागितली आणि सॅक मधील ५० हजार गायब केले….

कोल्हापूर : बँकेत पैसे भरण्यासाठी जाताना एकाने वाटेत लिफ्ट मागितली आणि पुढे जाताच दुचाकीवर मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने चालकाच्या सॅकमधील ५० हजार रुपयांची रोकड गायब केली. ही घटना सोमवारी दिनांक १० जून रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली, याबाबत तरुणाने शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीआर परिसरातील एका मेडिकलमध्ये काम करणारा तरुण सोमवारी दुपारी मेडिकलमधील ५० हजार रुपये भरण्यासाठी बँकेत निघाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्याकडे एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली.

 मदतीच्या भावनेने त्या तरुणाने त्या अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिली, किरण बंगल्याजवळ त्या व्यक्तीला उतरून तो तरुण बँकेत पैसे भरायला गेला असता त्याच्या लक्षात आले की सॅकमधील ५० हजारांची रोकड गायब झाले आहेत तो लगेच बाहेर कुठे पडले आहेत का याचा शोध घेऊ लागला शोध घेत तो पुन्हा सीपीआरपर्यंत गेला. तेंव्हां त्या तरुणाच्या लक्षात आले की लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीनेच पैशाची चोरी केली आहे.

त्याला याची खात्री पटताच तो लगेच शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये गेला आणि त्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *