Share Now
Read Time:54 Second
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील मयुरेश यशवंत चव्हाण वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले या तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयुरेश हा कामासाठी सांगलीत राहत होता. सांगलीतील राजूनगरजवळ भरणाऱ्या मंगळवार बाजारापसून काही अंतरावर त्याचा खून झाला आहे .घटनास्थळीचा पंचनामा केला असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत. घटनास्थळावर मयुरेशची दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेला दगड पोलिसांना मिळाला आला आहे . अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत.
Share Now