चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासात अटक….

जावेद देवडी /कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात काल दि. ११ जून रोजी पहाटे चोरीची घटना घडली होती. त्या प्रकरणी उमेश धोंडीराम शिंदे वय 26 यास २४ तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेश शिंदे हा एचएससी बोर्ड मोतीनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार साफळा रचून पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार सुरेश पाटील, युवराज पाटील व अमित सर्जे यांनी अरोपी उमेश धोंडीराम शिंदे याला मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा सीडी 100 मोटर सायकल मोबाईल असा एकूण 50,000/- किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, युवराज पाटील व अमित सर्जे यांनी केली आहे. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *