Share Now
Read Time:1 Minute, 10 Second
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स X’ हॅण्डलवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो अपलोड करून म्हटले आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’ चे उत्तम उदाहरण – उच्च वर्णीय हिंदू नागरिकांनी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध ख्रिश्चन, बहुजन यांनी उबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता!
दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही! ‘#घरात_आहे_पीठ’, असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Share Now