ओबीसींमधून नको पाच दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे आमरण उपोषण सुरु

अंतरवाली : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन काही दिवसांपूर्वी स्थगित झाले. मंत्री शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारला १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. अश्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा आमरण उपोषणाला बसले असून मागील पाच दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. ‘ओबीसी आरक्षण बचाव’ चा नारा देत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्री या गावामध्ये लक्ष्मण हाके गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न पोहोचवता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून एक शिष्टमंडळ मुंबई येथून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात दाखल झाले. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही तुम्ही उपोषण सोडा अशी हाक सरकारच्या वतीने या ठिकाणी भेटीसाठी आलेले मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री भागवत कराड यांनी केली मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या त्यानंतरच आम्ही उपोषण सोडू अशी ठाम भूमिका यावेळी उपोषण करते लक्ष्मण हाके यांनी घेतली सुमारे 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना सरकारच्या वतीने मुंबई येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून लवकरच यावर काहीतरी तोडगा निघेल अशी माहिती मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *