भरधाव कार आणि मोटर सायकलच्या अपघातातील कारचालक गजाआड..

कोल्हापूर : कोल्हापूर येथील सर्किट हाऊस जवळ दि. 17 जून रोजी रात्री 10.30 च्या सुमारास भरधाव कारने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस मुख्यालयातील वसीम इसाक मुल्ला (वय 38 रा. पोलीस लाईन) हे गंभीर जखमी झाले आहेत.

कसबा बावड्याकडून सर्किट हाऊसकडे एक भरधाव वेगाने कार येत होती त्याच दिशेने पोलीस हेडकॉन्स्टेबल वसीम मुल्ला हे मोटरसायकलवरून जात होते, यावेळी नशेत असलेल्या कारचालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यावेळी अपघात झालेल्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती; पण नंतर काही तासातच पोलिसांनी कारचालक गौरव विठ्ठलसिंग राठोड (वय 20 रा. चावडी गल्ली कसबा बावडा कोल्हापूर) याला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *