पूरबाधीत क्षेत्रातील 20 फ्लॅटवरील बांधकामांना सुरक्षाबोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, इमरजन्सी लाईट आवश्यक

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  : पूरबाधीत क्षेत्रातील 20 फ्लॅटपासून पुढे असलेल्या रहिवासी व वाणिज्य वापराच्या इमारतीमध्ये यापुर्वीची पूर परिस्थिती विचारात घेऊन सुरक्षेकरिता सुरक्षा (रेसक्यू) बोट, लाईफ जॅकेटस, लाईफ रिंग व इमरजन्सी लाईट इत्यादी उपाययोजना संबंधीत गृहप्रकल्पांचे विकसक यांच्याकडून तातडीने करुन घेणेच्या सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागास दिल्या.
कोल्हापूर शहरामध्ये सन २०१९ मध्ये उद्भवलेली पूर परिस्थीती विचारत घेऊन आगामी काळातील परिस्थितीस सामोरे जोणेसाठी आयुक्तांनी संबंधीत विभागांची मान्सून पूर्व आढावा बैठक निवडणूक कार्यालय येथे घेतली.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित करुन दिलेले आहेत. त्याप्रमाणे हि पूररेषा विचारात घेऊन नियंत्रण व सतर्कता क्षेत्रातील गृहप्रकल्पांचे ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी करुन घेणेच्या सुचना नगररचना विभागास दिल्या.

संबधीत गृहप्रकल्पांचे विकसकाने प्रकल्पांच्या दर्शनी भागात सुचना फलक लावणे, सुरक्षेकरीता सुरक्षा (रेसक्यू) बोट, लाईफ जॅकेटस, लाईफ रिंग, दोर व इमरजन्सी लाईट इत्यादी साधन सामुग्री पावसाळयापुर्वी घेणेबाबत नोटीस देणेच्या सुचना दिल्या. यासाठी 31 मे पर्यंत नगररचना विभागाने संबंधीत गृहप्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षतेबाबत केलेल्या उपाययोजनेचा अहवाल सादर करणेच्या सुचना दिल्या. पर्जन्य कालावधीत महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध खात्यांशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजना करणेबाबतचे नियोजन आत्तापासून करणेच्या सुचना दिल्या. शहर अभियंता व उपशहर अभियंता यांनी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हेक्षण तातडीने करुन घ्यावे. पूरबाधीत क्षेत्रामध्ये बोटी ने आण करण्यासाठी रुट नकाशा तयार करणेच्या सुचना उपशहर अभियंता यांना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, आपत्ती व्यवस्थापन तथा मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपशहर रचनाकार नारायण भोसले, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *