कंदलगाव येथे नव्याने सुरु होत असलेल्या वसतिगृहासाठी अर्ज करावेत..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 56 Second

कोल्हापूर : कंदलगाव येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुलांचे 1 व मुलींचे 1 प्रत्येकी 100 विद्यार्थी व विद्यार्थीनी क्षमतेचे नवीन स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरु होत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने असून सोबतचा क्युआर कोड स्कॅन करुन अर्ज उपलब्ध करुन घेऊन गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षाकिंत प्रतीसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर व संबंधित वसतिगृहाचे अधीक्षकांकडे अर्ज भरुन सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.

मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये इमाव, विजाभज, विमाप्र, दिव्यांग, अनाथ व आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) या प्रवर्गामधील इयत्ता 11 वी पासून पुढील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात 70 टक्के जागा व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात 30 टक्के जागेवर सन 2024-25 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय व शासकीय वसतिगृहामधून अर्ज विनामुल्य वितरीत करण्यात येत आहेत. तसेच प्रवेश अर्जाकरीता क्यु.आर.कोड व प्रवेश अर्जाची पीडीएफ आवश्यक त्या सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

वसतिगृह सुरु झाल्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन /डीबीटी, कॉट, गादी, उशी, बेडशीट, मोफत शैक्षणिक साहित्य, सुविधा- टेबल, खुर्ची, कपाट इ. व दरमहा निर्वाह भत्ता तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सर्व सोयी-सुविधा प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य पुरविण्यात येतील. नव्याने सुरु होत असलेल्या वसतिगृहात वसतिगृहनिहाय व प्रवर्गनिहाय पुढीलप्रमाणे जागा रिक्त आहेत (इमाव-51, विजाभज-33, विमाप्र-6, दिव्यांग-4, अनाथ-2 व आर्थिक मागास प्रवर्ग (EWS)-4 अशा एकूण 100 जागा).

इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे अधीक्षक आणि सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *