आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा,
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

Media control news network 

कोल्हापूर प्रतिनिधी/ विमानतळावर नवी टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. विविध नविन हवाई मार्ग सुरू होत आहेत. अशावेळी कोल्हापूरच्या पर्यटन, उद्योग व्यवसाय वाढीसाठी आणखीन एक पाऊल पुढे

Advertisements

कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर आठवड्यातील सातही दिवस, सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये इंडिगो कंपनीकडून विमान सेवा सुरू होत आहे. २९ मार्च पासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ, या दरम्यान इंडिगो कडून नवी सेवा सुरू होत असल्याची माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

रोज सकाळी आठ वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापूरसाठी इंडिगोचे विमान उड्डाण घेईल, आणि सव्वानऊ वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान, नवी मुंबई विमानतळावर, १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. तर सायंकाळी ७.२० वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान, साडेआठ वाजता कोल्हापुरात येईल. त्यानंतर ८ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारे विमान, ९ . ५० वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. विशेष म्हणजे आठवड्यातील सातही दिवस, इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होत असल्याने, कोल्हापुरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून, पुन्हा सायंकाळी कोल्हापूरला परत येणे सहज शक्य होणार आहे.

कोल्हापूरकरांची एक प्रदीर्घ मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून कोल्हापूर मुंबई मार्गावर दैनंदिन आणि सोयीस्कर खासदार महाडिक यांच्या कोल्हापूर विकास  कामात दिवसें दिवस वाढ होत आहे त्याबद्दल कोल्हापूर वाशीयांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *