राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा, जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे प्रशासनातर्फे आवाहन

Media control news network

कोल्हापूर प्रतिनिधी, दि. १९ कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आली आहे.अनेक दिवसापासून शिवप्रेमींची मागणी असलेली वस्तुसंग्रहालयाची अखेर उद्घाटनचा मुहूर्त ठरला असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थिती हा सोहळा पार पडणार आहे.

Advertisements

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक झाली.बैठकीस करवीचे तहसीलदार स्वप्निल पवार, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, अक्षय कुरणे, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी सी. एस. ओतारी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्राथमिक शिक्षण विभागाच्या रत्नप्रभा दवंडे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, शाहू स्मारक व्यवस्थापक दत्तात्रय नागर, अतुल पवार, बबनराव रातणे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, तसेच शिव प्रबोधिनीचे विजय पाटील, संस्था संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना देवून जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.लोकार्पण सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व नवनिर्वाचित नगरसेवक व जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.हा सोहळा लोकोत्सवासारखा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यानिमित्ताने समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान ‘शाहू समता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दुपारी ३ वाजता दसरा चौक येथून सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *