भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दोन हजारच्या वर दुचाकी सहभागाने रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्‍या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते.

त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.विशेषतः खासदार धनंजय महाडिक यांचे राजकीय वारसदार म्हणून राजकारणात प्रवेश करताना  कृष्णराज महाडिक यांची युवा वर्गात पसरलेली लोकप्रियता, पक्षपातळीवर कार्यात घेतलेला सहभाग त्यांनी यापूर्वी आपलं कोल्हापूर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी स्वतः कचरा निर्मूलन कसे करता येईल नागरिकांची यापासून कशी सुटका होईल याचे सखोल अभ्यास करण्यासाठी कोल्हापूर शहरात कचरा उठाव कशा पद्धतीने केला जातो याचे स्थळ पाणी करून स्वतःच्या अनुभवात भर पाडत कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह व्हावेत यासाठी कंपन्यांच्या बरोबर घेऊन बैठक घेऊन मांडलेली संकल्पना  कोल्हापूर विकास कामाबद्दल असलेली आपली इच्छा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये केलेली कामगिरी कोल्हापूर वाशियांसाठी असलेली आपुलकीची तळमळ व नेतृत्वाचे असलेली क्षमता भाजप पक्षाने दखल घेत प्रथमच कोल्हापूरला  युवा मोर्चाचे मोठेपद देऊन नवनिर्वाचित युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची निवड पक्षाला उभारी  देणारी योग्य निवड ठरणार आहे.तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने आज भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली. दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल.

Advertisements

त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये नगरसेवक विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

  ==========जाहिरात============

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *