देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 11 Second

कोल्हापूर प्रतिनिधी/ स्नेहा शिंगे : जागतिक महिला दिनानिमित्त देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सेंट्रल जीएसटी ताराबाई पार्क येथील सुपरिंटेंडंट सौ.माधवी संदीप कुरळे व लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कु.मयुश्वरी हनुमंत खरात या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सुरुवात नारीशक्ती या भित्तिपत्रकाच्या उद्घाटनाने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले.करवीर पंचायत समितीमध्ये सदस्या म्हणून निवडून आलेल्या पाचगाव च्या पालक सौ. दिपाली संजय पाटील यांचा सत्कार प्रमुख अतिथी सौ. माधवी कुरळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ओटी देऊन करण्यात आला. सौ दिपाली पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानले.सौ माधवी कुरळे यांनी विद्यार्थिनींना आपल्या गुरूंचे मार्गदर्शन घेण्याचा, मोबाईल न वापरण्याचा व आपले करिअर निश्चित करण्याचा उपदेश आपल्या मनोगतातून केला. कु. मयुश्वरी खरात यांनी विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा वापर न करण्याचा व प्रामाणिकपणे मेहनत करून यश मिळवण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेचा ज्येष्ठ अध्यापिका सौ. वनिता पाटील यांनीही मुलींना विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान व त्यांच्याकडून आपण कशाप्रकारे प्रेरणा घेतली पाहिजे या विषयी माहिती दिली. प्रशालेतील इयत्ता सहावीच्या ध्रुवी अजविलकर हिने झाशीची राणी, आराध्या कुरणे हिने सावित्रीबाई फुले, स्तुती सकटे हिने डॉ.आनंदीबाई जोशी यांची वेशभूषा करून त्यांच्याविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सहा.शिक्षका सौ.निलम घाटगे यांनी तर स्वागतगीत संगणक शिक्षिका सौ. रेश्मा पाटील यांनी सादर केले.पाहुण्यांचा परिचय सहा. शिक्षिका तनुजा शिरगावे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका सौ.मानसी माने यांनी आपल्या प्रभावी शैलीमध्ये केले. आभार सौ. सपना पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्री विद्यामंदिरच्या सौ सुवर्णा गुरव व सौ तृप्ती जाधव उपस्थित होत्या. तर महावीर भूपाल देसाई बालमंदिरच्या मनिषा गराडे व सौ. वैशाली साळोखे तसेच सौ. वंदना घोटणे उपस्थित होत्या. सर्व महिला व मुलींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सौ निलम घाटगे यांनी मुख्याध्यापक मा.श्री आर.ए.गाट यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *