कोल्हापुरात विविध ठिकाणी शाहू जयंती साजरी……

रहीम पिंजारी / कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हातकणंगले येथे लोक राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुलांच्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांनी सुंदर अशी शाहु महाराजांची वेशभुषा करून भाषणे ही केली .कार्यक्रमासाठी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मगदूम सर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिरसट सर उपस्थित होते त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत तून लोक राजा राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनशैलीचा उल्लेख केला.दरवर्षी आपल्या शाळेत विविध जयंती व कार्यक्रम साजरे केले जातात.

 

सम्राट अशोक कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी

सम्राट अशोक कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ छत्रपती शिवाजीनगर मनेर मळा येथील बौद्ध विहार मध्ये आज दिनांक 26 जून 2024 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. प्रथम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन बौद्धाचार्य गणपती बनसोडे यांनी केले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी धनाजी कांबळे संजना बनसोडे संदीप बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विजय घोडके सामाजिक कार्यकर्ते कुलदीप चौगुले गौतम बनसोडे सदाशिव हेगडकर सद्दाम मकानदार युवा अध्यक्ष रोहित घोडके वैभव कांबळे आदित्य डोने संकेत कांबळे राहुल कांबळे यश महाडेकर मल्हार महाडेकर तसेच भागातील नागरिक उपस्थित होते

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *