विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधिमंडळातील गैरकृत्याचा शिवसेनेकडून निषेध

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 14 Second

कोल्हापूर दि.०३ : विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला उपसभापतींच्या विरोधी पक्षनेत्याने लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करण्याची गोष्ट निंदनीय आहे. सार्वभौम सभागृहात जिथे राज्याची धोरणे ठरविली जातात, जनतेला न्याय देणारे निर्णय घेतले जातात, अशा पवित्र ठिकाणी शिवीगाळ करून गुंडगिरी प्रमाणे अंगावर धावून जाण्याचा प्रकार अखंड महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करणे हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिकवण विसरून उबाठा गटाचे गटनेतेच सभागृहाचा अवमान करत असतील तर ते लोकप्रतिनिधी पदाच्या लायक नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली.
विधिमंडळातील शिवीगाळ प्रकरणाचा जाहीर निषेध करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी “अंबादास दानवे कोण रे पायताण मारा दोन रे”, “राजीनामा द्या.. राजीनामा द्या..” अशा घोषणांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.


यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले कि, विधिमंडळात जो प्रकार घडला तो अतिशय क्लेशदारी होता. महिला उपसभापती, महिला लोकप्रतिनिधी असताना शिवीगाळ करणे हि महाराष्ट्राची संस्कुती नाही आणि शिवसेनाप्रमुखांची शिकवणही नाही. यामुळे विधिमंडळाचा अवमान झालाच पण अशा प्रकरणामुळे महिला लोकप्रतिनिधी काम करणं अवघड होईल. विरोधी पक्षनेत्या कडून अशा प्रकारची घटना घडणे यावरून राज्यात कुठल्या प्रकारची ही संस्कृती रुजवली जात आहे? याचा त्यांच्या नेत्यांनीदेखील विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, समन्वयक पूजा भोर, शिव उद्योग सहकार सेना शहरप्रमुख मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाडगे, अॅड.अमोल माने, दीपक चव्हाण, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, रिक्षा सेना शहरप्रमुख राजू पोवार, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शहर समन्वयक शैलेश साळोखे, शिवसेना उपशहरप्रमुख कपिल नाळे, सुरेश माने, प्रदीप मोहिते, अवधूत घाटगे, किरण पाटील, अंकुश निपाणीकर, श्रीकांत मंडलिक, कपिल सरनाईक, आकाश झेंडे, मुकुंद सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *