कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. शरद माने हा स्वतःच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे हा सगळा नरबळीचाच प्रयत्न होता असा संशय आला आहे. हा संपूर्ण प्रकार कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे होणार मोठा अनर्थ टळला आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात घडलेला घटने बद्दल कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नरबळी आणि जादुटोणा कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. गुप्तधन मिळण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता का? या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत.
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न..
