कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : केंद्र आणि राज्य शासनाने राज्यांतर्गत येण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत कक्ष निर्माण केला जाईल. या कक्षामध्ये अशा लोकांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील या कक्षात नोंदणी केल्याशिवाय तसेच परवानगी असल्याशिवाय आपल्याला आपल्या गावी जाता येणार नाही.
बाहेरच्या जिल्ह्यामधून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना सक्तीने १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार थेट आपल्या घरी न जाता सीपीआरमध्ये तपासणी करुन प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी. ग्रामीण भागातही अशा बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी संस्थात्मक अलगीकरणाची सोय करण्यात आली आहे, त्याठिकाणी थांबले पाहिजे. किमान त्याची तपासणी झाली पाहिजे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे यापुढेही असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी : पालकमंत्री पाटील

Read Time:1 Minute, 40 Second