इचलकरंजी शहापूर येथे अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या..

इचलकरंजी :   इचलकरंजी येथील शहापूर या ठिकाणी गावचावडी जवळ एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली असून, हा खून गांजाची नशा करून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, मयत सुशांत कांबळे हा आसरा नगर येथील रहिवासी होता, रात्री घरातून जेवण करून मी मित्राला भेटून येतो, असे सांगून सुशांत घरातून बाहेर निघून गेला होता तो परतून आलाच नाही. शहापूर गावचावडी या ठिकाणी त्याची दगडाने ठेचून व पाठीवर सफासफ वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याने शहरांमध्ये एकच खळबळ उडाली असून शहापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पंचनामा करण्यासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात मृतदेह पाठवला त्यानंतर सुशांत कांबळे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला होता.
सुशांत कांबळे यांची हत्या नशेच्या आहारी जाऊन केले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी समोर आणली आहे, इचलकरंजी शहरांमध्ये राजरोसपणे नशिले पदार्थांची विक्री व सेवन होत असल्याने अशा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील सध्या नागरिकांमधून होत असल्याचे दिसत आहे. या हत्याचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *