सह्याद्री उद्योग समुह सांगली यांचेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ५० हजार रुपयाची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : आपल्या देशासमोर कोरोना सारखे महाभयंकर संकट ओढवले असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना वर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकारला अनेक स्तरावर युद्धपातळीवर परिस्थितिशी सामना करावा लागत आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेकडून रू.१०००००/- , सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट कडून रू.१०००००/- , व सह्याद्री भाजीपाला फळे व फुले उत्पादक सहकारी संस्था सांगली यांचेकडून रू.५००००/- असा एकूण २,५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार मात्र) रुपयाचा निधी सांगली जिल्हाच्या नेत्या मा.जयश्रीताई पाटील यांच्या शुभहस्ते सांगली जिल्हाचे पालकमंत्री मा. ना.जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी मा.ना. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी मा.अभिजित चौधरी ,सह्याद्री उद्योग समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. शिकंदर जमादार सर, राष्ट्रवादीचे नेते मा. संजय बजाज , व सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था चे चेअरमन मा. राहुल काशिद, कसबे डिग्रज व्हा.चेअरमन राजेश सावंत हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *