पट्टणकोडोलीत तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 11 मेंढ्यांचा जागीच मृत्यु….

कोल्हापूर : कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील एका मेंढपाळाच्या तब्बल 11 मेंढ्यांवर तरस सदृश्य हिंस्र प्राण्याने हल्ला करून मेंढ्यांना ठार केले. पट्टणकोडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युवराप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या उसाच्या शेतामधून अचानकपणे घात लावून बसलेल्या तरस सदृश्य प्राण्याने या मेंढ्यांवर हल्ला चढवून तब्बल 11 मेंढ्यांना ठार केले त्यामुळे या तरस सदृश्य हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती वन खात्याला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असुन मेंढपाळाने वन खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.पट्टणकोडोली आणि परिसरात मेंढपाळ समाज मोठ्या प्रमाणात असून अशा तऱ्हेने तरस सदृश्य वन्य प्राण्याने मेंढ्यांवरील केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वनविभागाने अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मेंढपाळांतून आणि शेतकऱ्यातून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *