पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0 0

Share Now

Read Time:6 Minute, 17 Second

सांगली :  वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या 19 पिकासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पीक स्पर्धेतील पीके – खरीप पिके – भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण 11 पीके).

पात्रता निकष – स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर (0.20 हे.) व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 (0.40 हे.) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-31), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील पोषित केलेल्या चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख मुग व उडीद पीकासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2024, भात, खरिप ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल ३१ ऑगस्ट २०२४. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क – पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रकम 300 रूपये राहील व आदिवासी गटासाठी रकम 150 रूपये राहील.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका पातळीवर प्रथक क्रमांकास 5 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 3 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 2 हजार रूपये बक्षीस आहे. जिल्हा पातळीवर प्रथक क्रमांकास 10 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 7 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 5 हजार रूपये बक्षीस आहे. राज्य पातळीवर प्रथक क्रमांकास 50 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 40 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 30 हजार रूपये बक्षीस आहे.

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *