कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण : आज अखेर जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील २ हजार ६२१ ऑनलाईन अर्जदारांपैकी ४२१ जणांनी बस , मिनी बस तसेच चार चाकी वाहन परवान्यासाठी अर्ज केला होता. याची छाननी करुन यातील ३२० पात्र अर्जदारांच्या ६८३ वाहनांसाठी परवाने दिले आहेत.
वाहनपरवाना नको असणाऱ्या १ हजार ६२४ जणांचाही एकूण अर्जदरात समावेश आहे.
जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांचे ऑनलाइन अर्ज पण प्रत्यक्षात ६५९ उद्योग सुरु
