शालेय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेसाठी
11 जुलै पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार

सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय क्रीडा स्पर्धाना सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेने सुरुवात होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्यामार्फत जिल्हास्तर स्पर्धेचे तर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्यामार्फत महानगरपालिका स्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 जुलै 2024 पासून आण्णासाहेब डांगे पब्लिक स्कुल, आष्टा व जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, सांगली येथे करण्यात आले आहे. जिल्हास्तर व महानगरपालिका स्तर स्पर्धेच्या प्रवेशिका दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे स्विकारण्यात येतील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या स्पर्धा 15 वर्षाखालील मुले (दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला) व 17 वर्षाखालील मुले व मुली (दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला) अशा दोन वयोगटात आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेतील विजेते संघ कोल्हापूर येथे आयोजित होणाऱ्या विभागीयस्तर स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बोरवडेकर यांनी केले आहे. 

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *