कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना जागतिक महामारीच्या लढ्यात जीव धोक्यात घालून जनतेला सुरक्षा देणाऱ्या ग्रामपंचायतीसह प्रशासनातील विविध खात्यांमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे करण्यात आला.
चंदेरी महिला बचत गट व भूषण रियल इस्टेटचे अभिजीत जाखले व त्यांचे सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गडमुडशिंगी स्वागत कमानीजवळ हा सत्कार झाला.
आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सरपंच आणि सर्व ग्रा. प.सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी व कर्मचारी, वीज वितरणचे कर्मचारी, व अंगणवाडी सेविका तसेच प्राथमिक शिक्षक व ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समिती सदस्य आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
त्यात सरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच कविता सातपुते, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, आरोग्य सेविका संध्या महाजन यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सचिव कल्पना मडिवाळ. दिपाली पाटील, नम्रता पाटील व अभिजीत जाखले यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.