राधानगरी धरण 50% भरले : धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

कोल्हापूर, दि. 14 : धरण क्षेत्रात सूरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 50% पेक्षा जास्त भरले असून पावसाचा जोर वाढल्यास येत्या काही दिवसांत धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

 जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली..

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, वारणा नदीवरील -चिंचोली असे एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 4.21 टीएमसी, तुळशी 1.86 टीएमसी, वारणा 18.23 टीएमसी, दूधगंगा 9.88 टीएमसी, कासारी 1.50 टीएमसी, कडवी 1.77 टीएमसी, कुंभी 1.22 टीएमसी, पाटगाव 2.55 टीएमसी, चिकोत्रा 0.59 टीएमसी, चित्री 1.20 टीएमसी, जंगमहट्टी 1.06 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.03 टीएमसी, सर्फनाला 0.25 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18.1 फूट, सुर्वे 19.6 फूट, रुई 45.9 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 40 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 25 फूट, राजापूर 13.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली 8.5 फूट अशी आहे.

गगनबावडा येथे 63.4 मिमी पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 13.7 मिमी, शिरोळ -6.5 मिमी, पन्हाळा- 32.6 मिमी, शाहुवाडी- 61 मिमी, राधानगरी- 28.3 मिमी, गगनबावडा- 63.4 मिमी, करवीर- 18.7 मिमी, कागल- 18.5 मिमी, गडहिंग्लज- 14.5 मिमी, भुदरगड- 41.7 मिमी, आजरा- 28.3 मिमी, चंदगड- 24 मिमी असा एकूण 25.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *