विशाळगडावरील नुकसानग्रस्तांना प्रापंचिक साहित्यासाठी व घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदतीचे वाटप

कोल्हापूर : मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी या गावामध्ये रविवार दि. 14 जुलै 2024 रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेले होते. मुसलमानवाडी या येथील अंदाजे 41 घरांची जमावाने नासधुस करुन प्रापंचिक साहित्यांचे मोठे नुकसान केलेले होते. त्यामध्ये प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचेही नुकसान झालेले होते. नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करुन शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे. वाडीमध्ये अंदाजे 56 कुटुंबे रहातात. या 56 कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रत्येकी तातडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी 25 हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी 41 घरांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत धनादेशाव्दारे देण्यात आली.

वाडीतील इतर सर्व नुकसानीबाबत पंचनामे करुन विस्तृत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. हा अहवाल शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *