कोल्हापूर, दि. 19 : मुंबई मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कलव्दारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 55 वी पेंशन अदालत दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई- 400 001 येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली आहे.
निवृत्तिवेतनधारकाच्या लाझाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे इ. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी, एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तिप्पट प्रति, लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, न्यु एनेक्स भवन, चौथा मजला, मुंबई 400 001 वर 31 जुलै 2024 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुपाने पाठवायच्या आहेत.