गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणा चळवळीच्या अंतर्गत वृक्ष लागवड.

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणाची चळवळचे जनक डॉ. ज्ञानेश्वर मुळे अंतर्गत ,डॉ. चंद्रकुमार नलगे फाउंडेशन आणि अमोल बुडे, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते बांबरवाडी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये सुमारे दोनशे देशी झाडांची लागवड करण्यात आली. व सातशेच्या वर झाडांची सलग तिन दिवस परिसरात लागवड करण्यात येणार असल्याचे अमोल बुडे यांनीसांगितले.

पन्हाळा हे उंच हवेचे ठिकाण असल्यामुळे जोरदार पावसाच्या सरी वर सरी कोसळत होत्य आणि सोसाट्याचा वारा याची देखील पर्वा न करता आदर्श डॉ. ज्ञानेश्वर मुळे सरांच्या आदेशाने आजच्या वृक्ष लागवड चळवळीमध्ये आबाल वृद्ध तरुण तरुणी व रविवार असल्याने शाळेतील विद्यार्थि, विद्यार्थिनी मुले, मुली देखील सहभाग देऊन योगदान दिले.

 

मोहीम झाल्यानंतर सर्वांनी अल्पोआहार घेऊन मनसोक्त पन्हाळ गड फिरण्याचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *