सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेवुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करणेकामी आदेश देणेत आले होते.
त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पोलीस अंमलदार यांना बेकायदेशीर शस्त्रे विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेकामी पथक स्थापन करुन शोध घेतले असता
दिनांक २०/०७/२०२४ रोजी पथकातील पोकॉ/ संतोष गळवे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम सांगली ते आष्टाला जाणारे कृष्णा नदीजवळ रोडवर बेकायदेशीर तलवारी विक्री करणेकरीता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळालेने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन पाळत टेवली असता एक इसम संशयीतरित्या फिरताना मिळुन आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचे ताब्यातील डिलक्स मोटरसायकलचे कॅरेजला असलेले काळे रंगाचे पोते हे चेक केले असता त्याचे ताब्यात एकुण १० धारदार तलवारी मिळून आल्याने त्यास तलवारीसह ताब्यात घेवुन एकुण ६५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरच्या तलवारी कुठून आणल्या आहेत तसेच त्याने अशा प्रकारे आणखीन तलवारी विक्री केल्या आहेत का याचा तपास करावयाचा असलेने सदर आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक केली असुन आरोपी यांस मे न्यायालयाने दिनांक २२.०७.२०२४ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों/सचिन शिंदे सागंली शहर पोलीस ठाणे हे करित आहे.