कोल्हापूर/कुणाल काटे -ताराबाई पार्कातील डी मार्टमधील पदार्थांमध्ये अळया सापडल्याने सोमवारी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून डी मार्ट मधील विक्री व्यवस्था तात्पुरती बंद केले आहे. डी मार्टमधील ग्राहकांनाही बाहेर काढण्यात आले. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अळया सापडल्याचा आरोप करून याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील यांनी केली. सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. साायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डी मार्टवर कारवाई झाली. विक्री बंद करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात केले होते.या वेळी उपस्थित मनविसे चे ज़िल्हाध्यक्ष अभिजीत राऊत,शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे,ज़िल्हा सचिव नितेश गणेशचार्य,शहर सचिव राघव सरदेसाई,शहर उपाध्यक्ष सम्मेध मुधाले,विभाग अध्यक्ष वैभव अस्वले,यश केबलें,पृथ्वीराज घोड़के उपस्थित होते
कोल्हापूरातील डी मार्ट वर कारवाई
