Share Now
Read Time:1 Minute, 0 Second
कोल्हापूर, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23, सन 2023-24 पर्यंतचे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याकरिता दि. 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवक, युवतींनी आपले प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे 5 ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.
Share Now