कोल्हापूर/जावेद देवडी : जिल्ह्यात वाहन चोरीची प्रमाण वाढले असता पोलिसांकडून गोपनीयरीत्या सापळा रचून रेकॉर्डवरील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडील दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक मिळालेली माहिती अशी की
जिल्ह्यात काही महिने झाले वाहन चोरीचे प्रकार जास्त घडतेले पोलिसांना समजले या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी विशेष पथके तयार करून या चोरांचा शोध सुरू केला. यामध्ये पथकाला गोपनीय माहिती मिळाली की संतोष लाड व त्याचा साथीदार दर्शन जाधव यांनी वाडी रत्नागिरीतून अल्टो कार चोरलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून संतोष लाड वय 24 रा.फुलेवाडी कोल्हापूर, दर्शन जाधव व 22 अहिल्या होळकर नगर कोल्हापूर या दोन आरोपींना अटक केली. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने कार चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेली कार पोलिसांनी जप्त केली आणि त्यांचे साथीदार अशितोष कारंडे प्रतीक पाटील या दोघांना ताब्यात घेतले. चौघांना एकत्रित बसून पुन्हा चौकशी केली असता त्यांनी भोगावती परिसरातून आणखीन एक अल्टो कार चोरून साहिल मुल्ला याला स्क्रॅप करता विकली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी साहिल मुल्ला रा. राजोपध्यानगर कोल्हापूर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेली अल्टो कार पोलिसांनी जप्त केली.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण साठी जी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर,पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, संजय पडवळ, अमित मर्दानी व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे .