जिल्ह्यातील 77 बंधारे पाण्याखाली…

कोल्हापूर, दि. 30 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 38.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.4 मिमी, शिरोळ -2.2 मिमी, पन्हाळा- 23.2 मिमी, शाहुवाडी- 22.5 मिमी, राधानगरी- 12.4 मिमी, गगनबावडा- 38.7 मिमी, करवीर- 10 मिमी, कागल- 4.8 मिमी, गडहिंग्लज- 10.6 मिमी, भुदरगड- 31.6 मिमी, आजरा- 27.6 मिमी, चंदगड- 32.7 मिमी असा एकूण 15.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 15.6 मिमी पाऊस

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे व कांटे,  कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गारीवडे व पनोरे, वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड, तुरुंबे व कसबा वाळवे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, जरळी व हरळी, घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, हिंडगांव, तारेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण 77 बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.24 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 6 व 7 हे दोन  दरवाजे खुले असून सध्या धरणातून 4 हजार 356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.24 टीएमसी, तुळशी 3.24 टीएमसी, वारणा 29.13 टीएमसी, दूधगंगा 21.82 टीएमसी, कासारी 2.19 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.26 टीएमसी, पाटगाव 3.70 टीएमसी, चिकोत्रा 1.35 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 45 फूट, सुर्वे 43.3 फूट, रुई 73.11 फूट, इचलकरंजी 72.4 फूट, तेरवाड 67.6 फूट, शिरोळ 65.8 फूट, नृसिंहवाडी 65 फूट, राजापूर 53.5 फूट तर नजीकच्या सांगली  39.1 फूट व अंकली 45.5 फूट अशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *