सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आज 93 मॅनहोल चेंबर साफ

कोल्हापूर ता.02 : पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य रस्त्यावरील चेंबर लाईन महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर साफ सफाई करण्यात येत आहे. शहरामध्ये आज शुक्रवारी 93 मॅनहोल चेंबरची सफाई करण्यात आली असून ही ठाणे, नवी मंबई व बृहन्मुंबई महापालिकेच्या सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनद्वारे करण्यात आली आहे. या मशिनरी द्वारे मॅनहोल चेंबर साफ करुन 30 हजार लिटर राळ, गाळ व खरमाती चेंबरमधून काढण्यात आला. शहरामध्ये आजअखेर पूरबाधीत क्षेत्रातील व मुख्य रस्त्यावरील 358 चेंबरची सफाई पूर्ण झालेली आहे.

            हि सफाई लकी नाष्टा ते शाम सोसायटी, राजाराम चौक, विश्वेश्वर हॉल ताराबाई पार्क, अनुग्रह होटल ते आयुक्त बंगला, मस्कुती तलाव परिसर, शनिवार पोस्ट ते बुरुड़ गल्ली कमान, सोन्या मारुती  मंदिर मांगे रिक्षा  स्टॉप या परिसरात करण्यात आली.  हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्‍य निरिक्षक जयवंत पवार व सर्व आरोग्य निरिक्षक यांनी राबविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *