महापालिकेच्या वतीने वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा सत्कार

कोल्हापूर ता.15 :- स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त व हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने गुरुवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला.


यामध्ये जवान निवृत्ती मरळे यांची सून ज्योति मरळे, जवान लक्ष्मण रावराणे यांची सून स्मिता रावराणे, जवान जयसिंग भोसले यांची मुलगी नेहा वाडक, कॅप्टन शंकर वालकर यांची वहिनी सौ.माणिक वालकर, जवान सुनिल चिले यांचे भाऊ अनिल चिले, मेजर मच्छिंद्र देसाई यांची पत्नी श्रीमती सुनिता देसाई, जवान दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे, जवान अभिजीत सुर्यवंशी यांचा भाऊ नितीन सुर्यवंशी या देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सेवा बजावित असताना शहीद झालेल्या स्टेशन ऑफिसर भगवान जाधव यांची पत्नी श्रीमती जाई जाधव, फायरमन श्रीकांत पाटील यांची पत्नी श्रीमती अंजनी पाटील, फायरमन दत्तात्रय खामकर यांचा भाऊ शिवाजी खामकर, फायरमन अशोक माने यांची बहिन भाग्यश्री डकरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त साधना पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता सतीश फप्पे, रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, परवाना अधिक्षक राम काटकर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत, विजय वणकुद्रे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *