प्रेस क्लबच्या वतीने, मालोजी केरकर यांना जीवन गौरव पत्रकार पुरस्कार.

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 30 Second

 

डोळ्याला दिसतय ते फोटो मध्ये येते व जे दिसत नाही ते वृत्तपत्रामध्ये येते असे म्हटले जाते.

वृत्तपत्राचे छायाचित्रकार म्हटले की समाजामध्ये विशेष यांना महत्त्व आहे. असे असताना काळाच्या ओघांमध्ये अनेक बदल घडत गेले. पूर्वी लेन्सचे कॅमेरे घेऊन मैलो दूर चालत जाऊन फोटोग्राफी करायला लागायची,

असेच एक अवलिया श्री. शंकरराव घोरपडे (सरकार) छंद म्हणून नंतर समाजहितासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून हात पेंटिंगने जीवंत दर्शवणारे फोटो काढत काही काळ त्यांनी दैनिक सकाळ सारख्या माध्यमाला छायाचित्रकार म्हणुन वाचकवर्गात नावलौकिक मिळवले होते.
काही छायाचित्रकारांचे तर त्या काळी तुटपुंज मिळगत अशातच अठरा विश्व दारिद्रय गरिबी व आर्थिक परिस्थितीने एकदम बिकट अशी परिस्थिती असताना देखील समाजाच्या उन्नती व न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कोणतीही स्वार्थ व आशा न बाळगता धडपड करत छायाचित्रकार फोटोग्राफर म्हणून काम कराव लागत.
समाजाला जागृत करण्यासाठी उन्नती न्याय देणारे प्रसार माध्यम वृत्तपत्र छायाचित्रकारांना मोबदला त्यांच्या पसंतीनुसार देत नव्हते,
उलट कोणी मागायचा प्रयत्न केलाच तर त्यांना खडे बोल संपादकांचे असायचे
अरे माझ्यासाठी फोटो नाही समाजाच्या हितासाठी तु काम करतोस, समाजातील एका व्यक्तीने जरी तुला पाणी तांब्याबर दिला तर तुझ्यासाठी खूप आहे.
असे महणताच गप्प खाली माण घालुन छायाचित्रकार, संपादक/ मालक त्यांच्या केबिन पासुन बाहेर जात असे पुर्वी संपादकांचा सन्मान पुर्वक दरारा होता.
पण घरची परथिती कोणाला सांगणार म्हणून पावल्या वेळेत लग्नसराईत/ बारसे, छोटी छोटी कार्यक्रम करून दोन पैसे मिळवून आपले उदरनिर्वाह फोटोग्राफर चालवत असे
बदलत्या जगात डिजिटल युगामध्ये छायाचित्रकार फोटोग्राफर यांची मात्र आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही.
शासन, प्रशासन अनेक योजना काढत आहे. छायाचित्रकार फोटोग्राफर समाज हितासाठी झटणाऱ्या छायाचित्रकारांसाठीही योजना काडून त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी गांभीर्याने लक्ष देणे जरुरीचे आहे.

प्रसिद्धी माध्यम मध्ये निस्वार्थीपणे प्रदीर्घकाळ कार्यरत असणारे पत्रकार छायाचित्रकार यांचा सन्मान तमाम जनतेच्या साक्षीने प्रेस क्लबच्या वतीने विद्यमान अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित गौरव सोहळा…
कोल्हापूर प्रेस क्लब व कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर्स क्लब यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा जाॅनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना तर सुनिल सकटे व राहुल गडकर यांना रोहन साळुंखे स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून छायाचित्र प्रदर्शन व जाॅनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते.या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना जाहीर करण्यात आला असून त्याचबरोबर यावर्षी पासुन प्रिंट मिडीयातील पत्रकारांना  कै रोहन साळोखे याच्या स्मरणार्थ लक्षवेधी पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.सन २०२३ साठी पुढारीचे पत्रकार सुनिल सकटे तर २०२४ साठी सरकारनामाचे राहूल
यांना लक्षवेधी पुरस्काराने मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी शाहू स्मारक भवन येथे गौरविण्यात येणार आहे. या विधायक पत्रकार छायाचित्रकार गौरव समारंभाला आमच्या लाख लाख शुभेच्छा!

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *