कोल्हापूर ता.11 : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर शहरातील नागरीकांना गणपती विसर्जनासंदर्भात मदतीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मदत कक्ष (वॉर रुम) मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नागरीकांच्या सोईसाठी हे मदत कक्ष (वॉर रुम) सुरु करण्यात आले आहे.
या मदत कक्ष (वॉर रुम) मध्ये 0231-2545473 व मोबाई नंबर 9970711936 या दोन नंबर्सवर नागरीकांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. या कक्षामध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने स्वच्छता, फांदया कटींग करणे, घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने माहिती घेणे, कुंडांच्या ठिकाणांची माहिती नागरीकांना मिळणार आहे. तसेच विभागीय कार्यालयामध्ये आवश्यकती वाहने गणपतीची मुर्ती नेण्यासाठी उपलब्ध करुन मिळणे व इतर अनुषंगीक मदतीसाठी हा कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. तरी शहरातील नागरीकांनी, सार्वजनिक मंडळांनी या वॉर रुमशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.