करवीर पोलीस ठाण्याची कामगिरी बाचणी येथील युवक ऋत्विक उर्फ सनी जाधव याला गावठी बनावटीच्या पिस्तूलासह अटक..

कोल्हापूर/ प्रतिनिधी: करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाचणी ( तालुका करवीर ) येथील ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार राऊंड जप्त केले.

कमरेला हे पिस्तूल लावून तो गावात फिरत होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे हा मुद्देमाल आढळून आला.

Advertisements

त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. काँस्टेबल योगेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सनी जाधव याच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, हवालदार विजय तळस्कर, सुजय दावणे, विजय पाटील, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, अमित जाधव यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *