पन्हाळ्यात स्ट्रीट लाईट बंद चालुचा खेळ…!
नागरिकांना अंधारामुळे होतोय त्रास.

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 21 Second

 

पन्हाळा-प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर 

      पावसाळ्यात कधी झाड कोसळणे,कधी वायर तुटणे तर कधी अन्य काही कारणामुळे विद्युत पुरवठा बंद होण्याच्या घटना या सतत समोर येत असतात.मात्र पन्हाळ्यात यावर्षी पाऊस सुरु झाल्यापासुन स्ट्रीट लाईट कधी सुरु तर कधी बंद अशी स्थिती निर्माण झाली आहे.कधी-कधी तर चक्क दिवसाच स्ट्रीट लाईच सुरु असते.यामुळे पन्हाळगडावर स्ट्रीट लाईटचा बंद-चालुचा खेळ रंगला असल्याचे दिसुन येत आहेत.

पन्हाळ्यातील चार दरवाजा सोडुन पुढे आल्यावर साधोबा तलाव पासुन ते सज्जा कोठी पर्यंत मनेरोडवर तसेच ताराराणी रोड,भोसले गल्ली आदी ठिकाणी नेहमीच स्ट्रीट लाईट बद्द्ल पावसाळ्यात तक्रारी ऐकायला मिळतात.त्याच प्रमाणे पन्हाळ्यातील इतर गल्ली बोळात पण हीच स्थिती जाणवते.सध्या पावसाळा सुरु असल्याने पन्हाळगडावर पडणारा पाऊस आणि घनदाट धुके यामुळे दिवसादेखील समोर दिसणे मुश्कील बनते .शिवाय दिवसादेखील वाहनधाराकंना आपली हेडलाईट लावुनच प्रवास करावा लागत आहे.मग रात्रीच्या वेळी कसे चित्र असेल हे यावरुनच अनुभव मिळतो.अशा अंधारात स्ट्रीट लाईड बंद असल्याने मोबाईल टाँर्च अथवा बँटरी घेवुनच घरातुन बाहेर पडावे लागत आहे.दरम्यान मागील काही दिवसापुर्वी पन्हाळ्यात बिबट्याचा वावर झाल्याचे समोर आले आहे.तसेच गडावर प्राचीन काळपासुन विविध प्रजातीचे साप सापडतात.यामुळे रस्त्यावर लाईट नसल्याने बिबट्याचा आणि सापांचा धोका असल्याचे आहे.तरी गडावर स्ट्रीट लाईट बाबतीच्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

मागील काही वर्षापुर्वी पन्हाळ्यात नगरपरिषदेच्या वतीने स्ट्रीट लाईट चे काम करण्यात आले होते.स्ट्रीट लाईटीचे बिल हे नगरपरिषेदेकडुन महावितरणाला दिले जाते.सध्या याची देखभाल दुरस्ती करण्यासाठी नगरपरिषदेकडुन संबंधित कंपनीकडे महिन्याला ३५ हजार रुपयेाचा ठेका देण्यात आला आहे.तरी देखील कधी स्ट्रीट लाईट सुरु तर कधी बंद अशी स्थिती दिसुन येत आहे.तरी याकडे महावितरण व नगरपरिषदेने याकडे लक्ष देवुन स्ट्रीट लाईट कामयपणे रात्रीच्यावेळी सुरु ठेवावी अशी मागणी होत आहे.

चौकट:सध्या पन्हाळगडावर पावसाळा सुरु आहे.पावासाळ्यात येथे घनदाट धुके पडत असते.त्यातच रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद झाल्यास अधिकच अंधार जाणवते.मागील काही दिवसापुर्वी याच अधाराचा फायदा घेत कदाचित बिबट्याने मानवी वस्तीत आपली हजेरी लावली होती.तसेच सापांचा देखील वावर पन्हाळ्यात मोठा आहे.अधाऱ्यामुळे एखाद्या वेळेस सापांवर पाय पडुन काही तरी अनर्थ होण्याची शक्यता आहे .तरी याकडे लक्ष देवुन स्ट्रीट लाईट रात्रीच्या वेळी कायमपणे सुरु ठेवण्यात याव्यात.:-जुनैद मुजावर(पन्हाळा- उपशहरप्रमख शिवसेना,उ.बा.ठा)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *