मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा ३/१०/२०२४ रोजी केली.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ तारखेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून एक समिती गठीत करणेत आलेली होती. त्यामध्ये समितीच्या अध्यक्षस्थानी केंद्र सरकारनें विदेश मंत्रालयाचे सेवानिवृत्त सचिव व राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर यांची काही महिन्यापूर्वी निवड करण्यात आली होती.
डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सातत्याने पाठपुराव्यामुळे मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी व्यक्त केली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे तसेच तमाम देश विदेशातील मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांच्या कार्याला यश संपादन झाल्याने त्यांच्यासह मोलाचे सहकार्य करणाऱ्या तसेच मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाच्या चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. लवकरच आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर, यांचे नागरिक सत्कार करण्याचे नियोजन सुरू आहे.