स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली पोलीसांची निवडणूक पार्श्वभूमीवर धडक कारवाई..

सांगली जिल्हा प्रतिनिधी कौतुक नागवेकर 

सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी दि. १८.१०.२०२४ रोजी विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठक घेवून “कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे परिक्षेत्रातील सर्व जिल्हयामध्ये अवैध व्यवसायांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याचे समुळ उच्चाटन करावे” अशा सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने सदर पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्या लोंकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोहेकों / गुंडोपंत दोरकर, अमर नरळे, सोमनाथ गुंडे यांना खबऱ्या कडुन बातमी मिळाली की, सांगली ते सांगोला जाणारे रोडवरून आयशर माल वाहतुक गाडी नं के.ए. २२ डी. ७४२५ मधून बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, महाराष्ट्र शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटखा चोरुन विक्री करण्याकरीता वाहनातुन मिरजकडून सांगोलाकडे घेवून जाणार असल्याची खात्रीशीर खबर मिळाली.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, नागज गावातील हायवेवर सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे आयशर माल वाहतुक गाडी नं. के.ए. २२ डी. ७४२५ ही जात असताना दिसली. 

एका पेट्रोल पंपाजवळ थांबवून सदर ट्रक चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रायाप्पा कप्पान्ना पुजारी, वय ३५ वर्षे, रा उमराणी, ता चिक्कोडी, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले.

 सदर वाहन चालकास त्याचे कडे वाहनांमध्ये कोणता माल भरला आहे? तसेच त्याची बिल पावती आहे काय? तसेच तो कोठून आणला असून कोठे घेवून जाणार आहे याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सदर वाहनात

विमल सुगंधी तंबाखू व पान मसाला भरला असून तो कुडची, राज्य कर्नाटक येथून भरला असून तो पंढरपूरला घेवून जाणार आहे,

 तसेच लाल रंगाची टोयाटो इटीओस गाडी क्र. एम. एच. ०४ एफ. ए. ०१०२ मधून रोड दाखविण्याकरीता माझे समोर थोड्या अंतरावर जात आहे असे सांगितले. 

लागलीस थोड्या अंतरावर जावून पाहिले असता रोड कडेला लाल रंगाची टोयाटो इटीओस गाडी क्र. एम. एच. ०४ एफ. ए. ०१०२ ही संशयितरित्या थांबलेली दिसली. सदर गाडीतील चालकास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुनिल ज्ञानोबा शिंदे, वय ४२ वर्षे, रा नांदणी, ता शिरोळ, जि कोल्हापूर असे सांगितले. त्यास सदर आयशर माल वाहतुक गाडीतील सुंगधी तंबाखू व पान मसाल्याबाबत विचारले असता सदरचा माल हा चिक्कोडी मधील आण्णा (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी भरून दिला असून तो पंढपूर मध्ये देण्याकरीता पाठविले असल्याचे सांगितले.

तसेच सदर वाहने व इसमांस कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस नेवून पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल उतरून घेऊन त्याचा सविस्तर पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींवर कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत. मा. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर व मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली. यांनी आगामी विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने सांगली जिल्हयातील सर्व अवैध व्यवसायांवर कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत सर्व अधिकारी व अंमलदार यांना आदेश केले असून ही कारवाई अशीच चालू ठेवणेबाबत सुचना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *