आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 56 Second

 

भाजपाने फुंकले महापालिकेचे रणशिंग

कोल्हापूर दिनांक ३० भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी महापालिका निवडणूक याविषयावर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने कार्यरत असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.  

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, निवडणुका नसल्या तरी भारतीय जनता पार्टीचे सातत्याने संघटनात्मक कार्यक्रम सुरु असतात त्यामुळे कार्यकर्ता सदैव इलेक्शन मोडमध्ये असतो याचा फायदा नेहमीच पक्ष संघटनेला झालेला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाची माहिती सर्वांना दिली. ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉल देऊन तसेच नमो अॅप द्वारे भाजपा सदस्य नोंदणी करता येते. प्रत्येकाने आपल्या बूथ, मंडल स्तरावर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन सर्वांना केले. २०४७ मध्ये भारत देशाला विकसित भारत बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा असून या नोंदणी अभियानाच्या माध्यमातून याविषयात सक्रीय सहभाग नोंदवून मोदीजींच्या संकल्पाला पाठींबा देऊया. भाजपा सदस्य नोंदणी अभियान हे माध्यम असून आगामी महापालिका निवडणूक महत्वाची असून सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जिद्द, मतदार संघात संपर्क, सातत्य यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आव्हान करत भाजपाने महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत असल्याचे घोषित केले. 

यानंतर भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, भाजपा कार्यकर्त्यांच्या क्रियाशीलतेचा उपयोग करून प्रत्येक प्रभागात सर्वांनी समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवावेत, सदस्य नोंदणी अभियानाची निकोप स्पर्धा सर्वांमध्ये व्हावी. त्याचबरोबर महापालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी भाजपा कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही याची हामी देत यासाठी आजपासूनच सर्वांनी प्रभागात जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. 

याप्रसंगी अशोक देसाई, गायत्री राउत, डॉ राजवर्धन, राजू मोरे, शैलेश पाटील, विशाल शिराळकर, विशाल शिराळे, गिरीश साळोखे, सागर रांगोळे, रविंद्र मुतगी, सुनील पाटील, संग्राम जरग, दिलीप रनवरे, दिलीप मेत्राणी, सचिन सुराणा, कोमल देसाई, प्राची कुलकर्णी, लता बर्गे, शारदा पोटे, अश्विनी गोपूगडे, तेजस्विनी पार्टे, सुजाता पाटील, विद्या बनछोडे, रीना पालनकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

__________________________________________________

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *