जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या प्रयत्नाला यश..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 7 Second

 

Media control news network 

मिरज वॉर्ड क्रमांक ५ मधील बरेच वर्ष प्रलंबित असलेला आणि पावसा मध्ये वाहून गेलेला मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून २ कोटीचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आभार प्रदर्शन आणि या पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 पावसामध्ये हा पूल वाहून गेल्याने रुईकर बरगाले कोरे धुळूबुळू, कोरे , म्हैसाळे दुर्गाडे पांगळे मोतुकडे मळा परिसरातील शेतकरी ,महिला ,शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध यांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करावा लागत होता ही बातमी समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली होती या बातमीची दखल थेट मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली जनसुराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून डॉ. महादेव (अण्णा) कुरणे, डॉ. पंकज म्हेत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे २ कोटीचा निधी पुलासाठी मंजूर केला.

भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा समीत दादा कदम यांच्या हस्ते पार पडला हा पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते, 

विशेषता म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जनसुराज शक्ती पक्षाचे विनय कोरे (सावकार ) यांचे फोटो  विद्यार्थ्यांनी हातात घेऊन मुख्य मंत्री देवेंद्र मामा, उपमुख्यमंत्री एकनाथ मामा , उपमुख्यमंत्री अजित मामा, विनय कोरे मामा,समित कदम मामा यांचे धन्यवाद मानत घोषणा देण्याकडे विशेष लक्ष वेधत होते.

या वेळी नागरिक ,वाहतूकदार , सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून जनसुराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, डॉ. महादेव (अण्णा) कुरणे, डॉ. पंकज म्हेत्रे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी शाळकरी मुले व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *