‘इलू इलू’ ३१ जानेवारी पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार..‌

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 47 Second

Media control news netvrk

प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

संस्मरणीय आठवणींचा हा प्रवास दाखवताना प्रेमाच्या वेगवेगळ्या छटांची गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटात आहे. यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ‘नॉस्टॅलजिया’ देणारा हा चित्रपट असेल असं दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके सांगतात.

बॉलीवूड गाजवलेली प्रसिध्द अभिनेत्री एली आवराम हिने ‘इलू इलू’ चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर ‘किस किस को प्यार करूं’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॉईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ‘इलू इलू’ या चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे.

एली सोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.

‘इलू इलू’ चित्रपटातील मनाचा ठाव घेणारी ‘इलू इलू’, ‘गुलाबी गुलाबी’, ‘सोडव रे देवा’ ही तीनही गाणी सध्या गाजतायेत. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *