कोल्हापूर युवा पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला..

 

कोल्हापूर/प्रतिनिधी,  दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गोरगरीब नागरिकांना भोजनदान व चर्चासत्राचे कोल्हापूर युवा पत्रकार संघ कोल्हापूरच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. 

प्रथम मुख्य कार्यालय येथे दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून चर्चेला सुरुवात केली यावेळी पत्रकारांच्या शासन स्तरावर योजनेची माहिती देण्यात आली अनेक विचारवंत पत्रकाराने आपले मनोगत व्यक्त केले.

Advertisements

 संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी शासनाने जाहीर केलेल्या आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावावे या आदेशाची अंमलबजावणी म्हणून आपल्या संघातील सर्व पत्रकार सभासद, पदाधिकारी व हितचिंतक यांनी आपल्या नावापुढे आपल्या आदरणीय आईचे नाव लाऊन पत्रकार दिन साजरा करण्याचे सुचना दिले त्याच बरोबर शाहू स्मारक चौकात गोरगरीब नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रीती भोजनाची आस्वाद पाचशेच्या वर लोकांनी लाभ घेतला 

यावेळी कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष शिवाजी फुलाबाई तुकाराम शिंगे, रत्नादीप चव्हाण, अजय शिंगे, शिवाजी धनवंत, कौतुक नागवेकर, अमोल पोतदार, बाबुराव वळवडे, यश गेवारे, मेघराज हट्टी, जगप्रसिद्ध बावडा मिसळ चे संचालिका सौ.पूजा रत्नदीप चव्हाण, कोल्हापूर थाळीचे संस्थापक दिलीप प्रभावळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *