इथल्या” प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत शेडगे यांची निवड; शेडगे यांचे अभिनंदन,

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 30 Second

 

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/ विशेष प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न मांडणारे, निर्भिड, निःपक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांची नुकतीच एकमताने निवड पनवेल “इथल्या”प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल शेडगे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीस अनेक स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नवी मुंबई येथील पनवेल गेस्ट हाऊस येथे रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब ची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर आणि रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष मनोज खांबे व विजय मोकल तसेच अनिल भोळे यांच्या उपस्थित पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब ची स्थापना करण्यात आली.यामध्ये उपाध्यक्ष तृप्ती पालकर,सरचिटणीस हरेश साठे,कार्यध्यक्ष राजेंद्र पाटील आणि खजिनदार म्हणून दत्तात्रय कुलकर्णी,सल्लागार नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली. त्याच बरोबर पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब चे सदस्य जेष्ठ पत्रकार गणेश कोळी,संजय कदम,राकेश पितळे, सुमन नलावडे ,नितीन कोळी,सचिन भोळे, रायगड प्रेस क्लब चे विश्वस्त विजय मोकल आणि अनिल भोळे उपस्थित होते.
या वेळी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब चे नुतन अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करू तसेच जास्तीत जास्त तळागाळातील घटकांपर्यंत पोहचून गरजवंतांना मदतीचा हात देऊ.

शेडगे यांचे अभिनंदन:
अध्यक्षपदी शेडगे यांची निवड झाल्यावर विशेष करून कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन अध्यक्ष यांचा पुढील कार्यक्रमात सत्कार करण्याचे ठराव झालेचे समजते. समाजातील सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पनवेल शहर जुने भाजी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर मुंडकर आणि उपाध्यक्ष सोमनाथ इचके यांच्या सह सर्व व्यापारी वर्गाने अध्यक्ष प्रशांत शेडगे यांचं पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *